१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡️ लाभार्थी अटी येथे पहा ⬅️
Lek Ladki Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फुलंब्री तालुक्यातील ५४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र झाले असून, या ५४ मुलींना पाच हजार रुपयांचा नुकताच पहिला हप्ता जमा झाला आहे. तालुक्यातील ५४ लाभार्थी लाडक्या लेकींना जन्मापासून ते वयाचे १८ वर्षांपर्यंत टप्याटप्याने एक लाख रुपये मिळणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर यांनी दिली आहे.
१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡️ लाभार्थी अटी येथे पहा ⬅️
शासनाने यापूर्वी पूर्वी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी असलेली माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता लेक लाडकी या योजनेत बदलली आहे. या योजने अंतर्गत मुलींचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता मुलगी आणि आई यांच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता असे असे एकूण १ लाख १ हजार रुपये मुलींच्या खात्यांवर जमा करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलींच्या नावाची नोंदणी महिला बालविकास विभागाकडे केली आणि सर्व प्रमाणपत्राची पूर्तता केलेल्या तालुक्यातील ५४ लाभार्थ्यांना ५४ लाख रुपये मिळणार आहे.
१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡️ लाभार्थी अटी येथे पहा ⬅️
राज्यात एक एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे Lek Ladki Yojana.
१ लाख रुपये मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा
➡️ लाभार्थी अटी येथे पहा ⬅️